आज काल ची कार्टी...
मोठ्यांना नवीन पिढी बद्दल जेवढे कुतूहल आहे तेवढीच, किंबहुना त्याहून अधिक तक्रार आहे. आज काल ची पोरं पूर्ण पणे वाया गेली आहेत असे त्यांचे ठाम मत बनले आहे. एवढे मात्र नक्की की दिवसेंदिवस नवीन पिढी नियमांना झुगारून बंडखोर बनत चालली आहे. मोठ्यांबद्दल चा अनादर, नाही नाही ती व्यसने, बेशिस्त वर्तन, आणि बरेच काही..

पण नीट विचार करता एक गोष्ठ लक्षात येईल कि या सगळ्या परिस्थितीला मोठ्यांची पिढीच अंशतः जबाबदार आहे. जर तुम्ही लहानांना नीट मोठं नाही केलंत, त्यांच्यावर चांगले संस्कार नाही केलेत तर हेच होणार! लहान मुले अनुकरणातून बरेच काही शिकतात. जर त्यांच्यासमोर जे काही घडते आहे ते अयोग्य असेल तर ते काय सुधारणार. बापाने सिगारेटी ओढायच्या आणि पोरांना सांगायचं की चार हात दूर राहा नाही तर कानाखाली आवाज काढतो...हे कस चालेल? बरं अयोग्य वर्तनाला कठोर शिक्षा करणे हा काही योग्य उपाय नाही. एका मर्यादे नंतर शिक्षा केल्याने पोरं अजूनच बेरकी आणि निर्लज्ज बनतात. तरी आपल्या काढे काही तरी बरं आहे, पाश्चात्य देशात तर पोराला धड शिक्षा करता येत नाही! तिथली पोरं तर अजूनच बेफिकीरीने वागतात.

थोडक्या सांगायचा मुद्दा असा, की जर आता आपण (यंग जनरेशन) बेफिकिरीने आपल्या पोरांना मोठं केलं तर आपणही १५-२० वर्षांनी हाच डायलॉग मारत असू, "आज काल ची कार्टी, नुसती डोक्यावर चढली आहेत" -

आई कामावर, बाबा कामावर... घरी पोरगं टीवी बघतंय...आणि टीवी वर कोण???? -- राखी सावंत!! आता काय भलं होणार लहान पिढीचं?????

अंदाज अपना अपना मध्ये अमीर खान म्हणतो, "जब तक इस देश के बाप नहीं सुधरेंगे, तब तक उनकी औलादे नहीं सुधारेंगी|"
1 Response
  1. Yash Says:

    good,keep it up .....